Breaking News

पनवेल तालुका पोलिसांकडून निराधार ज्येष्ठ नागरिकांना मदत

पनवेल : बातमीदार

तालुक्यातील मौजे साई, पाले बुद्रुक, कोळवाडी, वावंजे, भिंगारवाडी व रिटघर येथील निराधार तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक सामुग्रीचे वाटप शनिवारी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांच्यासह त्या त्या बिट मधील पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. या वेळी रिटघर येथील पोलीस पाटील दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. हाताशी कोणत्याही प्रकारची कामे नसल्यामुळे विवंचनेत सापडलेल्या निराधार आणि जेष्ठ नागरिकांना अन्नधान्याची व्यवस्था करून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी आपले माणुसकीचे कर्तव्यही पार पाडले आहे. या वेळी त्यांनी तालुक्यातील विविध अशा गावांमधील निराधार ज्येष्ठ नागरिकांना तांदूळ, कांदे, बटाटे, साखर, तेल, मसाला आदी वस्तूंचे किट तयार करून स्वतः जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचविले आहे. या वेळी निराधार जेष्ठ नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

ग्राम संवर्धन संस्थेकडून वस्तू

पेण : रामप्रहर वृत्त

ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष संतोष ठाकूर, विश्वस्त चारुदत्त पाटील यांनी पेण तालुक्यातील वडमाल वाडी आणि खैरासवाडी येथील शंभर आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत कोरोना व्हायरस विषयी जनजागृती केली. लॉकडाऊनमुळे रोजगार नसलेल्या आदिवासी समाजावर भूक बळीचे संकट येऊ नये अनेक जण तांदूळ, गहू, डाळ यासारखे धान्य दिले जात आहे. परंतु दैनंदिन गरजेसाठी याव्यतिरिक्तही मसाले, कडधान्य, तेल, कांदे, बटाटे, साखर, चहा पावडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची गरज पडते हे लक्षात घेऊन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेने वस्तूंचे वाटप केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply