Breaking News

उरणमध्ये रविवारी पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन, शहीद वंदना

आमदार महेश बालदी यांची संकल्पना

उरण : रामप्रहर वृत्त
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेनुसार देशात प्रथमच पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन व शहीद वंदना या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा रविवारी (दि. 14) उरणमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
उरणमधील विमला तलाव येथे रात्री 10.30 वाजता हा सोहळा होणार असून 13 फूट खोल स्विमिंग पूलमध्ये डायविंग उपकरणासहित सुसज्ज असलेल्या भारतीय मरीनच्या माजी कमांडोच्या टीमकडून पाण्याखाली ध्वजारोहण केले जाणार आहे. याच कमांडोंकडून पाण्याखाली राष्ट्रगीत गायन होऊन ध्वज संचलन होणार आहे. तत्पूर्वी विमला तलावावर उभारण्यात येणार्‍या तरंगत्या व्यासपीठावर नृत्य आणि संगीत असलेले अमृत महोत्सवाचे कार्यक्रम होतील.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, डीपी वर्ल्डचे एशिया प्रमुख रिजवान सोमर, जे. एम. बक्सी ग्रुपचे संचालक ध्रुव कोटक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा ध्वजारोहण सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे राष्ट्रभक्ती दर्शविणारा हा सोहळा उरणकरांसह देशासाठी अभिमानास्पद ठरणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply