Breaking News

शिवसेनेचे संकुचित राजकारण -शेलार

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नेमके कुणी दिले याची सगळीकडे चर्चा असताना, शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते अटकेबाबत बोलताना दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत, न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत संयमी शरद पवार यांच्यासोबत राहूनही शिवसेनेचे हे संकुचित राजकारण आहे, अशी टीका शिवसेनेवर केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केली आहे. नारायण राणे यांना केलेली अटक हे बेकायदेशीर होती. अनिल परब यांनी अटकेचे आदेश दिले ते गृहमंत्री आहेत का? त्यामुळे शरद पवार यांनीदेखील नाराजी व्यक्त केल्याचे आम्ही वर्तमानपत्रात वाचले आहे. गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असताना अनिल परब घूसखोरी कशी करतात, असे आशिष शेलार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना 75 हजार पत्र लिहिणार आहोत. हा देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. कृपया लक्षात ठेवा, असे पत्राचे स्वरुप असणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले. तसेच संयमी शरद पवार यांच्यासोबत राहूनही शिवसेनेचे हे संकुचित राजकारण आहे, अशी टीका देखील शेलार यांनी केली.

नारायण राणेंचा जो जामीन अर्ज निकाली निघाला तो अर्ज आधीच रद्द होणार असल्याचे अनिल परब सांगतात, याचा अर्थ मंत्र्यानी या सगळ्या प्रक्रियेत दलालांमार्फच हस्तक्षेप केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अनिल परब आणि सबंधित पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी केली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply