Breaking News

अलिबागमध्ये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग : जिमाका

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त  अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानात सोमवारी (दि. 15) रायगड जिल्ह्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. पोलीस दलाच्या पथकांनी या वेळी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणार्‍या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी या वेळी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील,  स्नेहा उबाळे, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  निलेश घुले, पोलीस उपअधीक्षक जगदीश काकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसीलदार विशाल दौंडकर, मीनल दळवी, सचिन शेजाळ, डॉ. सतिश कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर, डॉ. शीतल जोशी, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

‘परिवर्तन‘ कार्यपुस्तिकेचे प्रकाशन

जिल्हा प्रशासनाने केलेले विविध लोकोपयोगी उपक्रम, कार्यक्रमांवर आधारित परिवर्तन (अंक 3 रा) या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन या वेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या प्रतिभावंत लोकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply