पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील तरणखोप येथे बेकायदेशीररीत्या दारूसाठा बाळगल्याप्रकरणी पेण पोलिसांनी एकास अटक केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तरणखोप (ता. पेण) गावालगत धृव चायनिज सेंटर आहे. त्याच्या बाजूला पेण पोलिसांना बुधवारी (दि. 9) तीन हजार 621 रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूसाठा बाळगलेला आरोपी आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दारूसाठा जप्त केला. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक पवार अधिक तपास करीत आहेत.