कर्जत : बातमीदार
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या कर्जत विभागाच्या वतीने सोमवारी (दि. 15) शहरातील अंबामाता मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 73 दात्यांनी रक्तदान केले. सह्याद्री प्रतिष्ठानचे सुधीर साळोखे, प्रणव जंगम, स्वप्नाली पाटील, सूरज खडे यांच्यासह अनेक सदस्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.