Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार

अलिबाग : प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला आहे. हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे एकमेव विद्यालय ठरले आहे. याबद्दल या विद्यालयाचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बुधवारी (दि. 17) विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने कार्यकारी मंडळाचे सदस्य परेश ठाकूर आणि विद्यालयाच्या प्राचार्य राज अलोनी यांनी हा सन्मान स्वीकारला.
रायगड जिल्हा परिषदेच्या ना. ना. पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले (सामान्य प्रशासन), राजेंद्र भालेराव (ग्रामपंचायत विभाग), नितीन मंडलिक (महिला व बालविकास), शुभांगी नाखले (पाणी व स्वच्छता विभाग), कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, माध्यमिक शिक्षण विभाग अधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव, मुख्य लेखा, वित्त अधिकारी भगवान घाडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील बहुतांश शाळांनी सहभाग घेतला होता. त्याचे मूल्यमापन करून जिल्ह्यांनी प्रतिजिल्हा 14 शाळांचे नामांकन केले. त्यानुसार शाळांची राज्यस्तरीय मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली. यात ग्रामीण प्राथमिक व माध्यमिक आणि शहरी प्राथमिक, माध्यमिक तसेच उपश्रेणी असे विभाग होते. त्या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण मंत्रालयाकडून स्वच्छ विद्यालयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शहरी भागातील माध्यमिक शाळांमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने फाइव्ह स्टार रेटिंगसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याचप्रमाणे राज्यातून एकूण 26 शाळांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्यातही रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा समावेश झाला आहे. या बहुमानाबद्दल स्कूलच्या प्राचार्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सन्मान स्वीकारतेवेळी समन्वयक, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply