Breaking News

राज्यातील मंजूर ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष

पनवेल : प्रतिनिधी –

मुंबईत सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील मंजूर ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीबाबत तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.  राज्यातील महामार्गावर होणारे अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता अपघातग्रस्तांसाठी गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत उपलब्ध होणेसाठी सन २०१३ मध्ये १०८ ट्रामा केअर सेंटर उभारणीचा बृहत आराखडा शासनाने तयार केला आहे. सद्य:स्थितीत या १०८ ट्रामा केअर सेंटरपैकी केवळ ६३ सेंटर कार्यरत असून उर्वरीत ४५ सेंटरपैकी १५ सेंटरचे बांधकाम अपूर्ण तर ३० सेंटरचे आराखडेच तयार करण्यात आले नसल्याने सदर ४५ सेंटर ही मागील ९ वर्षापासून कार्यान्वित झाली नसल्याचे एप्रिल २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे. यातील काही सेंटरसाठी जागा उपलब्ध नसून काही सेंटर बंद असल्याचेही निदर्शनास आले आहे तसेच, प्रत्येक ट्रामा केअर सेंटरमध्ये दोन अस्थव्यंगोपचार तज्ज्ञ, दोन बधिरीकरण तज्ज्ञ यासह ३३ पदांना मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असल्याचे देखिल निदर्शनास आले, त्या अनुषंगाने या प्रकरणी चौकशी करून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता.  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हंटले आहे कि, सार्वजनिक आरोग्य विभागाने सन १९९७ ते आजपर्यंत १०८ ट्रामा केअर सेंटर मंजूर केले आहे. सन २०१३ च्या बृहत आराखड्यानुसार ४२ नविन ट्रामा केअर सेंटर्सना मंजूरी देण्यात आली आहे. यातील काही सेंटरसाठी जागा उपलब्ध नसून काही सेंटर बंद असल्याचेही निदर्शनास आल्याची बाब खरी आहे. तसेच प्रत्येक ट्रामा केअर सेंटरमध्ये दोन अस्थव्यंगोपचार तज्ज्ञ, दोन बधिरीकरण तज्ज्ञ यासह ३३ पदांना मान्यता देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ट्रामा केअर सेंटरबाबत शासनास शिफारस करण्यासाठी गठीत तांत्रिक समितीचा अहवाल / शिफारशी सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक १८ सप्टेंबर २०२० स्विकारण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने ट्रामा केअर युनिटचे वर्गीकरण केले असून ट्रामा केअर ची दर्जावाढ करण्यास मदत होणार आहे. त्याअनुषंगाने आयुक्तालयाने दिनांक २९ डिसेंबर २०११ रोजी सदर शिफारशी विचारात घेऊन अस्तित्वात असलेल्या ट्रामा केअर युनिट संबंधित सुधारीत आकृतीबंध शासनास सादर केला आहे. याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. परंतू सदर प्रस्तावात काही त्रुटी असल्याने त्याबाबत आयुक्तालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply