Breaking News

सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे!

आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’ या उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यातून अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. या मुद्द्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरून आपली भूमिका मांडली आहे. दोन लाख 50 हजार नवे रोजगार आणि 61 हजार कोटींची गुंतवणूक? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग? आधी हे सांगा आत्महत्या करणार्‍या शिक्षकांना पगार कधी देणार? शेतकर्‍यांचा सातबारा कोरा कधी करणार? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले? निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत कधी मिळणार? उद्ध्वस्त पूरग्रस्त शेतकर्‍यांना मदत कधी पोहचणार? आरोग्य सेविका, कोविड योद्धे यांना मानधन कधी मिळणार? शाळांची फी कपात करून पालकांना दिलासा कोण देणार?, असे सवाल करीत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली तसेच ‘सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!,’ अशा शब्दांतही फटकारले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply