Breaking News

राज्यात “मिशन वात्सल्य” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात तारांकित प्रश्न 

पनवेल : प्रतिनिधी –

राज्यात “मिशन वात्सल्य” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रित केले.       राज्यात कोरोना संसर्गाने मातृ-पितृ छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना तसेच कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे कोरोनाने निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांच्या उपजिविकेसाठी तसेच अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न ‘मिशन वात्सल्य’ या योजनेअंतर्गत करण्यात यावा असे शासनाचे निर्देश आहेत तथापि, या योजनेच्या तालुका पातळीवर नियमित बैठका होत नसल्याचे एप्रिल २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे.  तालुक्याच्या तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली आठवड्याला एक या प्रमाणे महिन्याला चार बैठका घेणे अपेक्षित असतानाही मुंबई उपनगरातील अंधेरी, कुर्ला व बोरिवली या तीन तालुक्यात फक्त दोन बैठका आणि सहा महिन्यात पाच बैठकाही न झालेले अनेक तालुके असल्याचा आरोप एकल महिला पुनर्वसन समितीने केला असल्याचे निदर्शनास आले असून कोकण प्रदेशातील मुंबई, मुंबई उपनगर जिल्ह्यासह अन्य ५ जिल्ह्यातील १५० अनाव बालकांची पी. एम. चाईल्ड केअर योजनेत नोंदणी झालेली असताना आतापर्यंत त्यापैकी केवळ ८३ बालकांच्याच खात्यात मुदत ठेव निधी जमा केला आहे तर उर्वरित ठाणे (सर्वाधिक अनाथ बालके), व मुंबईसह ६७ लाभार्थी बालके या योजनेच्या मुदत ठेव निधीसह अन्य आर्थिक लाभापासून वंचित राहिले असल्याचे एप्रिल २०२२ रोजी या त्यासुमारास निदर्शनास आले आहे, या योजनेच्या प्रत्येक तालुक्यात नियमित बैठका घेऊन तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ अनाथ बालकांना तसेच विधवा महिलांना देण्याबाबत शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे, अशी विचारणा प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात करण्यात आली असून त्या अनुषंगाने योग्य कार्यवाहीची मागणी या प्रश्नातून अधोरेखित केली.  राज्याचे महिला व बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भात दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, एप्रिल २०२२ अखेर मिशन वात्सल्य अंतर्गत तालुका निहाय समित्यांच्या बैठका मुंबई उपनगर जिल्हयामध्ये अनुक्रमे अंधेरी-४, कुर्ला-५ बोरीवली-५ अशा बैठका झाल्या आहेत. तर मुंबई शहर जिल्हयामध्ये ६, रायगढ़ जिल्हयामध्ये ४९ सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये २००, रत्नागिरी जिल्हयामध्ये ५५, ठाणे जिल्हयामध्ये ७ व पालघर जिल्हयामध्ये ३० इतक्या बैठका झाल्या आहेत. कोकण विभागातील सर्व पात्र लाभार्थ्यांना पी. एम. केअर फॉर चिल्ड्रेन योजनेचा लाभ देण्यात आला असून मिशन वात्सल्य योजनेंतर्गत दिनांक १३ जुलै २०२२ अखेर एकूण १,२०,६४० लाभार्थ्यांना शासन निर्णयामध्ये नमूद २४ सेवांचे २५,९२४ एवढे लाभ देण्यात आले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply