Breaking News

ज्येष्ठ नेते वसंत पाटील यांच्यातर्फे गव्हाण विद्यालयास आर्थिक भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील गव्हाण विद्यालयामध्ये वसंत पाटील नावाच्या ज्येष्ठ नेत्याने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दातृत्वाची स्फूर्ती घेऊन विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके म्हणून कायमस्वरूपी ठेव ठेवण्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांजकडे सुपूर्द केला. याआधीही काही महिन्यांपूर्वीच त्यांनी विद्यालयाला चांगल्या प्रतीची कपाटे भेट दिली होती.

चालू शैक्षणिक वर्षारंभी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षक पालक संघाच्या सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना वसंत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांसाठी एक लाख रुपयांचा धनादेश कायमस्वरूपी ठेव ठेवण्यासाठी देण्याची जाहीर केले होते. त्यांनी हा एक लाख रुपयांचा धनादेश विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे यांच्याकडे सुपूर्द केला असून या वेळी ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, विद्यालयाचे लेखनिक चंद्रकांत मढवी व ग्रंथपाल महेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

वसंत पाटील यांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या धनादेशाची रक्कम बँकेत कायम ठेव म्हणून ठेवण्यात येणार असून तिच्या व्याजातून मिळणार्‍या रकमेची पारितोषिके इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत, असे विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply