Breaking News

कळंबोली वाहतूक पोलिसांच्या सतर्कमुळे दाम्पत्य बचावले

पनवेल : वार्ताहर

पनवेल जवळील फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल जवळून जात असलेल्या एका ट्रॅकरखाली रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटर सायकलवरील दाम्पत्य आले होते, परंतु तेथे कर्तव्यावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सतर्कमुळे त्या दोघांचा जीव बचावला आहे.

फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल यंत्रणा विद्युत पुरवठा अभावी बंद होती. त्यामुळे त्याठिकाणी कर्तव्यावर कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोहन सुदाम मुळीक, हवलदार प्रकाश भास्कर भोरे, रवींद्र मोरे, निलेश लांगरे हे होते. दरम्यान एक ट्रॅकर सदर ठिकाणावरून जात असताना रस्तावरील खड्डे वाचवण्याच्या नादात दुचाकीवर असलेले ते दाम्पत्य त्या ट्रँकरखाली आले. हा अपघात झाल्याचे बघताच त्यांचा जीव वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेतली व ट्रँकरला थांबवून या दोघांना सुखरूप बाहेर काढले. महिलेला थोडे खरचटले असून आपला जीव बचावल्याचे पाहून या दाम्पत्याने कळंबोली वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत.

Check Also

नवीन पनवेल येथे भीम जयंती महोत्सव; गायक आनंद शिंदे यांचा बहारदार कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीचे …

Leave a Reply