Breaking News

‘अभिनंदन’ने फोडली सोन्याची हंडी

नवी मुंबई : प्रतिनिधी

सानपाडा सेक्टर 8मधील हुतात्मा बाबू गेनू मैदानावर भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी मानाची सोन्याची दहीहंडी आयोजित केली होती. ही ‘सोन्याची हंडी’ मुंबईतील फेरबंदर येथील अभिनंदन गोविंदा पथकाने आठ थर लावून फोडली.

भाजप नवी मुंबई महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या हस्ते सव्वातीन लाख रुपये किमतीच्या मानाची हंडीचे पारितोषिक देण्यात आले. एकूण 155 दहीहंडी पथकांनी सोन्याची हंडी फोडण्यासाठी सहभाग नोंदविला तर 153 पथकांनी या दहीहंडीला सलामी दिली. या दहीहंडी सोहळ्यात सोन्याची हंडीव्यतिरिक्त इतरही 18 हंड्याचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवामध्ये भाजपचे नगरसेवक  गिरीश म्हात्रे, यांच्यासह चिंतामणी बेल्हेकर, अशोक विधाते, रुपेश मढवी, अ‍ॅड. चंद्रकांत निकम, शेखर भोपी, जयंत म्हात्रे, रॉबिन मढवी, महेश मढवी, पंकज दळवी, सुखदेव वामन, देवनाथ म्हात्रे, घणशाम पाटे, अमोल सावंत, जया अलिम चंदानी (जया फांऊडेशन), महेश मढवी, पुण्याहून आलेले विविध मान्यवरांसह एसबीआय बँकेचे आयटी सेक्टरचे व्यवस्थापक अरविंद तेजपाल, सहाय्यक व्यवस्थापक जे.पी. चंद्रा सहभागी झाले होते. हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यत मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply