परेश ठाकूर यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन
कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे सेक्टर 21 येथे नव्याने नादभ्रम्ह इडली हे हॉटेल सुरू झाले आहे. हे हॉटेल प्रतिक शिंदे व प्रम शिंदे यांनी सुरु केलं असून या नादभ्रम्ह इडली या हॉटेलचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 21) उद्घाटन झाले. या ठिकाणी अवघ्या 10 रुपयांमध्ये इडली मिळणार असून या नवीन व्यवसायाला परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच पुढील यशस्वी वाटचाली करीता सदीच्छा व्यक्त केल्या.
कामोठे वसाहतीमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणत झाले असून या ठिकाणी अनेक उद्योग नव्याने सुरु होत आहे. त्यानुसार प्रतिक शिंदे व प्रेम शिंदे यांनी अवघ्या दहा रुपयांमध्ये इडली अशी सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नादभ्रम्ह इडली हा व्यवसाय नव्याने सुरु केला आहे. या हॉटेलचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासहस्ते उद्घाटन झाले. या वेळी समाजसेवक प्रदिप भगत, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष नितेश भुगे आदी उपस्थित होते.