Breaking News

खांदा कॉलनीत कॅन्सर चिकीत्सा शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनीत नव्याने सुरू झालेल्या ओन्कोकेएर सेंटर यांच्या माध्यमातून पनवेल तालुका भंडारी समाजाचे एक दिवसीय कॅन्सर चिकीत्सा शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 21) करण्यात आले.

या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत भंडारी समाजाचे मान्यवर नेते उपस्थित होते. या वेळी ओन्केकेएर सेंटरचे मुख्य डॉ. देवेंद्र पाल यांनी केएर सेन्टरची माहिती दिली. कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात उपचार होण्याअगोदर प्राथमिक स्टेजमध्ये त्यांवर उपचार झाले तर कॅन्सर बरा होऊ शकतो. त्यामुळे या केअर सेंटरमध्ये प्राथमिक उपचार होऊ शकतात अशी

माहिती त्यांनी दिली. त्यांचा रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पनवेल तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष डॉ. दीपक खोत, सेक्रेटरी रत्नराज महाडिक, विनायक शिवलकर, मिलिंद नरसे, परेश शेटे, शिरीष केळेसकर, राजेश कनगुटकर, प्रणिता कदम, महेंद्र दुधवडकर आदींनी मेहनत घेतली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply