कर्जत : बातमीदार
तालुक्यातील शेलू येथे सामाजिक कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांनी उल्हासनगर येथील साई प्लॅटिनम हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल 310 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. साई हिरेमठ यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान अनिकेत घुले यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांच्या शेलू रेल्वे स्थानकाजवळील कार्यालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसने यांच्या हस्ते करण्यात आले होते. साई प्लॅटिनम रुग्णालयाचे डॉ. सोहेल, सोमनाथ चव्हाण, श्नेहाल ननवरे यांच्या पथकाने शिबिरार्थींची नेत्र तपासणी केली. या वेळी रेखा हिरेमठ यांच्या हस्ते 310जणांना चष्मे वाटप करण्यात आले.कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता मनवे, प्रा. हनुमंत भगत, शिक्षिका विनिता जंगम, तसेच दशरथ टेम्ब्रे, मंगेश तरे आदी या वेळी उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थ कृष्णा बोराडे, अक्षय हिसाळगे, योगेश देशमुख, मनोज शेकटे, विवेक पार्टे, अरमान शेख, अनिकेत भगत, विठ्ठल परब, अनिकेत खरमाळे, रमेश भोईर, संतोष मसणे, नरेश कराळे, रवी घारे, संजय मसणे, मनोज तरे, कविता भक्के यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.