Monday , January 30 2023
Breaking News

नवघर गावातील दफनभूमीची समस्या सोडवा; ग्रामस्थांची मागणी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यातील नवघर गावात दफनभूमीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. दफनभूमीसाठी पुरेशी योग्य जागा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा, दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच या ठिकाणी विद्युत डिपीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे येथील अडचणीत अधिकच भर पडली आहे. या संपूर्ण प्रकाराकडे नवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील यांनी पत्रव्यवहाराद्वारे सिडको, ग्रामपंचायतीचे सरपंच, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण कार्यालय यांचे लक्ष वेधले आहे.

नवघर गावात सिडकोने बांधलेल्या स्मशानालगत विद्युत डीपीचे काम चालू आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा सिडकोकडून लहान मुलांचा दफनभूमीत जागा उपलब्ध करून न दिल्याने या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत नवघर गावातील ग्रामस्थांना दफन करावे लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत लहान मुलांना दफनभूमीसाठी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत काम थांबविण्यात यावे, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

बांधण्यात येणार्‍या डीपीच्या जागेसाठी सिडकोकडे कोणत्याही प्रकारचे परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामस्थांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत मार्फत ते काम चालू आहे. त्यामुळे विद्युत डीपी दुसरीकडे लावण्यात यावी. नवघर गावातील ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन मुलांच्या दफनभूमीसाठी लगेच जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply