स्वागताची जय्यत तयारी, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
पाली : प्रतिनिधी
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे रायगड जिल्हा दौर्यावर असून, बुधवारी (दि. 24) ते पालीत येणार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश व उत्साह संचारला आहे. ठिकठिकाणी स्वागत बॅनरच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल बुधवारी सकाळी 7.50 वाजता खांब (ता. रोहा) येथून सुधागड तालुक्यातील पालीकडे प्रस्थान करणार आहेत. सकाळी श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिरातून भक्तनिवास क्र.1 येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता आयोजित बाईक रॅली कार्यक्रमास्थळी त्यांचे आगमन होणार आहे. तेथून तालुक्यातील वावे येथे होणार्या बूथ कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहून केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल पेणकडे प्रयाण करणार असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी दिली.
पेणमधील महात्मा गांधी ग्रंथालयात बुधवारी सकाळी 11 वाजता ना. प्रल्हाद सिंह पटेल दुर्बल घटकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील. त्यानंतर पेण वाशी येथील जगदंबा मंदिर हॉलमध्ये ते ग्रामस्थांबरोबर संवाद साधणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या दौर्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, त्यांनी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत.