Breaking News

कर्जत, खालापुरातील शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

कर्जत : प्रतिनिधी

शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कर्जत आणि खालापूर तालुक्यातील  पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या पदाधिकार्‍यांना मंत्री उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित नियुक्तपत्रे देण्यात आली.

शिवसेनेच्या (शिंदे गट) नवनियुक्त पदाधिकार्‍यांत विजय भाऊ पाटील (उत्तर रायगड संपर्क प्रमुख), उल्हास भुर्के (उत्तर रायगड सहसंपर्कप्रमुख), पंकज पाटील (कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख), शिवराम बदे (कर्जत विधानसभा संघटक), संभाजी जगताप (कर्जत तालुका प्रमुख), संदेश पाटील (खालापूर तालुका प्रमुख), पद्माकर पाटील (खालापूर शहर प्रमुख), संदीप पाटील (खोपोली शहर प्रमुख), लक्ष्मण रिठे (खोपोली शहर संघटक), हरीश काळे  (खोपोली शहर संपर्क प्रमुख) यांचा समावेश आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply