Breaking News

मुरूडमधील शिबिरात 56 जणांचे रक्तदान

मुरूड : प्रतिनिधी

समाजसेवक डॉ. सनाउल्लाह घरटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरूडमधील संजीवनी आरोग्य सेवा संस्था आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 24) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 56 जणांचे रक्तदान केले. मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे व रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक गोसावी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. मकबुल कोकाटे,  संजीवनी संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, प्राचार्य डॉ. नगरबावडी, डॉ. संजय पाटील, चंद्रकांत अपराध, राशीद फहीम, आदेश दांडेकर, शशिकांत भगत, किर्ती शहा, अजित कारभारी, शकील कडू, जाहिद कादिरी, डॉ. अनंत जोशी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. तरक्षक दलाचे जवान, महाविद्यालयीन विद्यार्थी, संजीवनीचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी शिबिरात रक्तदान केले. सुनील बंदीछोडे, श्रेयस पाटील, आकाश सावंत, उमेश पाटील व संजीवनीच्या कर्मचार्‍यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply