Breaking News

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या खंडणी वसुली कारभाराचा पनवेलमध्ये भाजपकडून जाहीर निषेध

पनवेल ः हरेश साठे
पोलिसांना दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे टार्गेट देऊन महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 21) जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.
पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग समिती ’क’ सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग समिती ’ड’ सभापती सुशिला घरत, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश पोद्दार, माजी नगरसेविका नीता माळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत शेळके, चंद्रकांत मंजुळे, सुधाकर थवई, प्रवीण खंडागळे, शिवाजी भगत, प्रसाद हनुमंते, चिन्मय समेळ, विश्वजित पाटील, शाहवेज रिझवी, महेंद्र गोजे, राखी पिंपळे, सोनाली सावंत, लक्ष्मी चव्हाण, गौरी पवार, शोभा पन्हाळे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदविला.
’महाराष्ट्रातील पोलिसांना बदनाम करणार्‍या अनिल देशमुखांचा धिक्कार असो’, ’महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो’, ’वसुली महाआघाडी सरकारचा निषेध असो’, ’तीन तिघाडा काम बिघाडा’, ’महाविकास आघाडी सरकार वसुली सरकार’ अशा गगनभेदी घोषणा देत गृहमंत्री अनिल देशमुख व महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या सावळागोंधळाच्या कारभाराची लक्तरे परमबीर सिंह यांच्या ’लेटरबॉम्ब’मुळे वेशीवर टांगली गेली आहेत. अँटिलिया स्फोटके तपासावरुन सुरू झालेले हे प्रकरण नंतर मनसुख हिरेन, सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचले आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. असे असतानाही अद्याप ठाकरे सरकार निद्रिस्त अवस्थेत आहे. धनंजय मुंडे, संजय राठोड या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांच्या बाबतीतही मुख्यमंत्री मुख्यमंत्री ठाकरे स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. राज्याच्या वैभवशाली परंपरेला काळीमा लावण्याचे काम होत असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, तसेच त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

पोलीस दलाचे खच्चीकरण होतेय : अरुणशेठ भगत  
परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक आहे. एका डीजी रँकच्या अधिकार्‍याने असे पत्र गृहमंत्र्यांबद्दल लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. गृह विभागात नियुक्ती किंवा बदलीबद्दल जे काही घडत होते त्याचा हा कळस आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत म्हणाले की, मुंबई पोलीस दलाचे खच्चीकरण करणारी, मानहानी करणारी ही घटना आहे. कोणी छोट्या-मोठ्या व्यक्तीने लावलेला आरोप नाही, तर एका डीजी रँकच्या अधिकार्‍यांनी हा आरोप केला आहे. पुरावा म्हणून चॅटही सोबत जोडलेले आहे आणि तो पुरावाच आहे. भगत यांनी अनिल देशमुख गृहमंत्री पदावर राहिल्यास चौकशी कशी होईल, असा सवालही केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि संबंधित प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशीदेखील व्हायला हवी.
-जयंत पगडे, अध्यक्ष, पनवेल शहर भाजप मंडल

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठ्यात आंदोलन  
कामोठे ः दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे पोलिसांना टार्गेट देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा  राजीनामा आणि चौकशीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत कामोठे येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, नगरसेविका अरुणा भगत, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप भगत, भाऊ भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील, भास्कर दांडेकर, नाना मगदूम, संदीप तुपे, मनीषा वणवे, सुरेखा लांडे, कल्पना जाधव, तेजस जाधव, प्रवीण कोरडे, सुरेंद्र हल्लीकर, विकी टेकवडे, मनीष मांडले, आशिष पटेल, हरिश्चंद्र ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply