कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर (कर्जत) यांच्या ’शब्दांकित’ आणि ’माझं क्षितिज’ या पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन झाले. या वेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात संतोष जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांनी पुस्तकांबद्दल माहिती दिली. कुलगुरू सुहास पेडणेकर, कवी अरुण शेवते, संगीत साम्राज्ञी बेगम परवीन सुलताना, लेखक नितीन आरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आरती कदम, मुखपृष्ठकार सतीश भावसार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मनोज जोशी यांनी पुस्तकातील ’भाई’ हा लेख वाचून दाखविला.
डॉ. समीरा गुजर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अभिनेते मनोज जोशी, संतोष रोकडे, राजेंद्र पै, अतुल परचुरे, ज्ञानदा पेंढारकर, अरुण म्हात्रे, कौशल इनामदार, अतुल परचुरे, सोनिया परचुरे, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, रवींद्र आरेकर, किशोर वैद्य, गिरीश आरेकर, प्रियांका साठे, दिलीप गडकरी, प्रसाद पाटील, राजाभाऊ कोठारी, रंजन दातार, प्रभाकर करंजकर, प्रदीप गोगटे, गणेश वैद्य, श्रीकांत ओक, दिपचंद ओसवाल, वालचंद ओसवाल, मुकुंद मेढी, विवेक मुझुमदार आदींसह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.