Breaking News

नुतन बांधकामाचा शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम

जेएसडब्लू फांउडेशनचे रेवदंडा को.ए.सो.माध्यमिक शाळेस योगदान

रेवदंडा : प्रतिनिधी

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रेवदंडा येथील  माध्यमिक शाळेत जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून  मुलींसाठी शौचालय उभारण्यात आले आहे. त्याचे नुकताच लोकार्पण करण्यात आले.

या वेळी शाळेच्या प्रांगणात मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने रेवदंडा माध्यमिक शाळेत मुलींसाठी नविन शौचालय बांधण्यात आले आहे, या शौचालयाचे नुकताच लोकार्पण करण्यात आले. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे सीएसआर विभाग प्रमुख राम मोहिते, अधिकारी राकेश चवरकर, राजेंद्र खिचर, मॅजिक बस संस्थेच्या पूजा ठाकूर, शीतल गायकर, रेवदंडा विद्या संकुलाच्या चेअरमन सरोज वरसोलकर, प्राचार्या स्नेहल म्हात्रे, सुरेश खोत यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply