Breaking News

रयत बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गव्हाण विद्यालयात प्रचार सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त

आशिया खंडातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेचा बहुमान प्राप्त झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांची अर्थवाहिनी असलेल्या रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून संस्थेच्या सर्व विभागात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये रयत सेवक संघाचे उमेदवार किशोर पाटील व संघाच्या पॅनलच्या इतर सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ संघाचे समन्वयक व रयत बँकेचे माजी व्हाईस चेअरमन नुरा शेख यांच्या नेतृत्वाखाली दौरा झाला. या वेळी त्यांच्या समवेत उमेदवार किशोर पाटील तसेच बँकेचे विद्यमान संचालक, माजी व्हाईस चेअरमन आणि या शाखेतील अध्यापक व संस्थेच्या लाईफ मेंबर व समन्वय समितीचे सदस्य प्रमोद कोळी, संस्थेचे दुसरे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, नावडे शाखेतील उपशिक्षक सुनील चिखले, जासई शाखेतील ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्राध्यापक अरुण देवरे, रयत सेवक संघाचे रायगड विभागीय खजिनदार नितीन ठाकूर आदी उपस्थित होते. संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, नितीन ठाकूर, प्रा. अरुण देवरे, सुनील चिखले, विद्यालयाच्या जुनिअर कॉलेज विभागाचे प्राध्यापक बाबुलाल पाटोळे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, शिक्षक आणि सेवक सभासद उपस्थित होते. उपशिक्षक सागर रंधवे यांनी प्रास्ताविकपर भाषण करून आभार मानले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply