Breaking News

सीकेटी महाविद्यालयात प्लेसमेंट पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस् , कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये प्लेसमेंट पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी (दि. 27) महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुसा अंतर्गत, प्लेसमेंट सेल, अतर्गत गुणवत्ता हमी कक्षा आणि टाटा स्ट्राइव्ह (ढअढअ डढठखतए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सॉफ्ट स्कील फॅसिलिटीअर टाटा स्ट्राइव्हच्या स्नेहा सारस्वत व बीएफसीआय फॅसिलिटीअर टाटा स्ट्राइव्हचे अबरार शेख उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, आय. क्यू. ए. सी. समन्वयक  डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. एस. एस. कांबळे यांनी उपस्थिती दर्शविली.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाच्या कीर्तीचा मागोवा घेतला. तसेच महाविद्यालयात प्लेसमेंटसाठी कोणकोणते कार्यक्रम राबविले जातात हे वर्तविले. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. एस. एस. कांबळे यांनी केली. प्रमुख पाहुणे स्नेहा सारस्वत यांनी बायोडेटा कसा तयार करावा व त्याचे कोण कोणते प्रकार आहेत, मुलाखत कशी द्यावी, व्यक्तिमत्वाचे विविध प्रकार आणि त्यांचे उपयोजन मुलाखतीत कसे करावे याबद्दल माहिती दिली. या प्रशिक्षणात 250 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. या बद्दल त्यांना प्रमाण पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकीय विज्ञान विभागाच्या प्रा. आरती परदेशी यांनी केले तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. अन्वेश वेमुला यांनी या आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रा. एस. एस. कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रस्तुत प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply