Breaking News

कामोठे येथे विश्व हिंदू परिषदेचा वर्धापनदिन आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे येथील शंकर मंदिरात विश्व हिंदू परिषदचा 58वा वर्धापनदिन रविवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व कोकण प्रांत समरस्ता सह प्रमुख कृष्णा बांदेकर, दत्ताजी सुर्वे, नगरसेविका कुसुम म्हात्रे, निलम आंधळे, भाऊ भगत आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सध्याच्या काळात विश्व हिंदू परिषद कीती गरजेची आहे त्याबद्दल सांगितले. तसेच कृष्णा बांदेकर यांनी सामाजिक समरस्ता हा विषय समजुन सांगितला. कार्यक्रमात शेवटी कामोठ्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांना नवीन जबाबदार्‍या देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply