पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील चोळई येथे सोमवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास एका घराबाहेरील दुचाकी, घरातील मोबाइल व रोख रक्कम तसेच बॅकेचे पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील बांधकाम व्यवसायीक रोहिदास सदाशिव मोहिते यांच्या घरासमोरील हिरो होण्डा पॅशन प्रो मोटारसायकल, चार हजार रूपये, महाड अर्बन बॅकेचे पासबुक, आधारकार्ड आदी कागदपत्रे आणि एमआय कंपनीचा आठ हजार रूपये किंमतीचा मोबाइल फोन असा ऐवज अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरून नेला.
या चोरीप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक प्रशांत नटे अधिक तपास करीत आहेत.