भाजप नेते विनोद म्हात्रेंच्या प्रयत्नाने भूखंडांवर आरक्षण
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा कार्यान्वित होण्यास 27 वर्षानंतर मुहूर्त मिळाला आहे. मनपाची पहिली विकास योजना प्रशासनाने 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केली. यात नवी मुंबई मनपा क्षेत्रात 625 आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नवी मुंबईतील संगीतप्रेमी व उच्च शिक्षित अशी खायटी असणार्या करावे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सिडकोच्या भुखंडाची मागणी अनेक वर्षापासून भाजपचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आणि माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यांच्या मागणीला अथक प्रयत्नांती यश आले आहे. नवी मुंबई विकास योजनेत व नियंत्रण नियमावलीत जाहिर केलेल्या आरक्षणाप्रमाणे करावे गावासाठी 10 भुखंडावर आरक्षण टाकण्यात आले आहे. माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी पालिका आयुक्त, महापौर तसेच भुखंडाच्या विकासच्या अनुषंगाने सिडकोकडे पालिकेने पाठपुरावा करावा यासाठी पालिकेच्या सभागृहात प्रशासनाचे लक्ष देखील वेधले होते. त्यांनी केलेल्या मागण्या पालिकेच्या विकास योजना आराखड्यात पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक भुमीपुत्रांच्या करावे गावांचा वैविध्यपुर्ण विकास होणार आहे.
या सुविधा मिळणार : प्रभाग क्रमांक 110 करावे गावामध्ये लग्न, साखरपुडा व विविध धार्मिक, वैयक्तीक कार्यक्रमासाठी दोन समाजमंदिर, कै. गणपतशेठ तांडेल मैदाना विविध क्रीडा प्रकारासाठी इनडोअर स्टेडियम, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेता भारत सरकारच्या मीठागर जागेवर गावासाठी नवीन जलकुंभ, श्री गणेश तलावा शेजारी 350 चौ. मीटरचे अद्ययावत मासळी मार्केट, पामबीच रोडच्या लगत 14000 चौ. मी भुखंडावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्टस-कामर्स-सायन्स व नर्सिंग महाविद्यालय, करावे-पामबीच मार्गालगत 20 एकर जागेवर समुद्र किनारी समुद्रेश्वर मंदिराजवळील जागेत भव्य सागरी उद्यान (मरीन गार्डन), भुखंड क्रमांक-162 सेक्टर 44 सीवुड्स नेरूळ या 950 चौमी जागेवर आरक्षणानुसार बहुउद्देशीय इमारत, पामबीच रोड चाणक्य जेटीपर्यंत समुद्र संरक्षक भिंतीलगत सहा मीटर रुंद रस्ता आणि 500 चौमी भूखंडावर दशक्रिया व धार्मिक विधीसाठी शेड आणि कै. गणपतशेठ तांडेल मैदाना लगत 29000 चौमी भूखंड असून या ठिकाणी बहुउद्देशीय मैदान असे विकास प्रकल्प आराखड्यानुसार आरक्षित असणार आहेत.