Breaking News

मधुमेह सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

लायन्स क्लब पनवेल, श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने मधुमेह सप्ताहांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर पनवेलमधील बालाजी मंदिरात सोमवारी (दि. 18) झाले. या शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, यामधील 15 रुग्णांना मधुमेह, तर 17 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले. मधुमेह सप्ताहानिमित्त ठिकठिकाणी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील श्री बालाजी मंदिरात लायन्स क्लब पनवेल व श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट पनवेलच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा लाभ अनेक गरजूंनी घेतला. अनेक रुग्णांना डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. नेत्रतपासणीदरम्यान 45 जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान 17 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले. त्यांचे

हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे. या शिबिरावेळी जाजू, सचिव लायन ज्योती देशमाने, अशोक गिल्डा, श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थानचे ट्रस्टी चंद्रकांत जाजू, गिरीश कासट, मनीष गिल्डा, जगदिश लाहोटी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपक्रम पार पाडण्यास नायर हॉस्पिटल नवीन पनवेल, आधार हॉस्पिटल पनवेल, शुश्रुषा हार्ट केअर हॉस्पिटल, नेरूळ, नवी मुंबई यांच्या स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply