Breaking News

विकासकामांच्या बाबतीत आमचा नाद कोणी करायचा नाही -आमदार भरत गोगावले

निजामपूर भागातील विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्याच्या निजामपूर भागातील कोस्ते (खुर्द), भागाड, साजे, सणसवाडी, विळे वरचीवाडी, मांजूर्णे येथील नळ पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन शिवसेना (शिंदे गट) विधीमंडळ पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी विकासकामांच्या बाबतीत आमचा नाद कोणी करायचा नाही, असा टोला विरोधकांना लगावला. माणगाव तालुक्यातील कोस्ते (खुर्द) नळ पाणीपुरवठा योजना (एक कोटी 88 लाख रुपये), तासगाव नळ पाणीपुरवठा योजना (एक कोटी नऊ लाख), भागाड नळ पाणीपुरवठा योजना  (92 लाख 50 हजार रुपये), साजे नळ पाणीपुरवठा योजना (एक कोटी 14 लाख रुपये), सणसवाडी नळ पाणीपुरवठा योजना (एक कोटी 28 हजार 226 रुपये), विळे वरचीवाडी नळ पाणीपुरवठा योजना (72 लाख 84 हजार 360 रुपये), मांजूर्णे नळ पाणीपुरवठा योजना (44 लाळ 57 हजार 947 रुपये) आणि तासगाव आदिवासीवाडी सामाजिक सभागृह इत्यादि विकासकामांचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. यापुढे निजामपूर विभागात विकासनिधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही आमदार गोगावले यांनी या वेळी दिली. माणगाव तालुक्यात आणि निजामपूर विभागातील पाणीपुरवठा योजनांचे श्रेय घेण्याचा विरोधक केविलवणा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही आणलेल्या कामाचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये, असे खडेबोल आमदार गोगावले यांनी या वेळी सुनावले. शिवसेना (शिंदे गट) दक्षिण रायगड जिल्हासंपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना जिल्हाधिकारी विपुल उभारे, तालुकाप्रमुख अ‍ॅड. महेंद्र मानकर, नितीन पवार, अविनाश नलावडे, राजेश कदम, मनोज सावंत, जितू तेटगुरे, गणेश समेळ, सुधीर पवार, दत्तूशेठ पवार, आप्पा म्हामुणकर, सरपंच अण्णा कोदे, संचिता मोरे, सतीश मोरे,  संजय गुळंबे, गणेश पवार, अ‍ॅड. सुशील दसवते, सुनील पवार,  विलास शिंदे, वैभव मोरे यांच्यासह ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply