नागोठणे : प्रतिनिधी
मित्राच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याच्या उद्देशाने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नागोठणे गवळ आळीमध्ये राहणार्या साहिल संजय कडू (वय 18) या तरुणाला त्याचाच मित्र प्रितेश गजानन केदारी (वय 23) या तरुणाने गळा दाबून ठार केल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक केली.
साहिल व प्रेतेश हे जवळचे मित्र होते. प्रितेशवर कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी प्रितेश चिंतेत होता. त्याच वेळी त्याच्या डोक्यात त्याचा मित्र साहिल याच्या गळ्यातील चैन चोरण्याचा विचार आला. त्यासाठी प्रितेशने साहिला 29 ऑगस्ट रोजी वासगावकडे जाणार्या पायवाटेने जंगलात नेले. तेथे त्याने साहिलच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत प्रितेश याने आपल्या जवळील दोरीने साहिलचा गळा आवळून त्यास ठार केले.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर नागोठणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपीचे मोबाइल कॉल व त्याने चोरी केलेली सोन्याची सोनाराकडे विकण्याचा प्रयत्न केला त्यावरून हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी प्रितेश गजानन केदारी याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजन जगताप करीत आहेत.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …