Breaking News

पेणमध्ये ट्रेलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून पेणजवळील रामवाडी ब्रिजवर पुन्हा एकदा अपघात होऊन दुचाकीवरील महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. जगदिश हिरामण कोळी (40, रा. कोळवे, वडखळ) हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच-06,बीएल-7608) पत्नी तृप्तीसह (35) गुरुवारी (दि. 17) सकाळी वडखळ बाजूकडून पेणकडे येत होते. रामवाडीजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणार्‍या ट्रेलरची (एनएल-01,एसी-9887) धडक बसली. या अपघातात ट्रेलरचे चाक तृप्ती कोळी यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या गंभीर जखमी होऊन मृत पावल्या, तर जगदिश कोळी हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी मंगेश हिरामण कोळी (35, रा. कोळवे)  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पेण पोलीस ठाण्यात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply