खोपोली ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 4) खोपोलीत विविध भागात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. नगरपालिका हद्दीतील लवजी या ठिकाणी पाटील कुटूंबियांच्या सार्वजनिक श्री गणरायाचे दर्शन आमदारांनी घेतले, त्यावेळी त्यांचे कुटूंबियांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी युवा मोर्चा सरचिटणीस विनायक माडपे, कार्यकर्ते सिद्धेश पाटील व इतर मान्यवर, भाजपचे
नेते उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या श्लोकची आंतरराष्ट्रीय भरारी!
‘३:३०’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा पनवेल : …
RamPrahar – The Panvel Daily Paper