Breaking News

साई विभागातील ग्रामस्थ शिवसेना शिंदे गटात दाखल

माणगाव ः प्रतिनिधी

साई विभागातील साई कोंड, विहुले व काकल गावातील तसेच आमडोशी व सुरव गाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्ते मंगळवारी (दि. 6) शिंदे गटाचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. या वेळी शिवसेना नेते अ‍ॅड. राजीव साबळे, दक्षिण रायगड शिवसेना संपर्क प्रमुख अरुण चाळके, शिंदे गट जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हा युवासेना प्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख अ‍ॅड. महेंद्र मानकर, शिंदे गटाचे शहरप्रमुख सुनील पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, श्रीवर्धन मतदार संघाचे शिंदे गटाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुशील दसवते, नगरसेवक दिनेश रातवडकर, स्वीकृत नगरसेवक हेमंत चंद्रकांत शेट, युवा कार्यकर्ते वैभव मोरे उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार भरत गोगावले यांनी, शिवसेना-भाजप युतीचे हे सरकार लोकाभिमुख कामे करीत असून येणार्‍या काळात जास्तीत जास्त विकासकामे आपण मार्गी लावू. सुनील तटकरेंनी अनेक वर्षे या लोकांना विकासकामांची आश्वासने देऊन खितपत ठेवले होते. त्यामुळे हे बदल होत असून अनेक गावांतील लोक आपल्या प्रवाहात सामील होत आहेत. येणार्‍या काळात विरोधकांना विकासकामे काय असतात हे निश्चितच दाखवून देऊ, असे आश्वासित केले. या वेळी साई कोंड येथील प्रशांत अधिकारी, नरेश अधिकारी, संदेश अधिकारी, श्रीराम नलावडे, महादेव अधिकारी, पांडुरंग मोहिते, शिवदास अधिकारी, विशाल मोरे, सत्यवान अधिकारी, राकेश अधिकारी, संदीप अधिकारी, आकाश अधिकारी, रोहन अधिकारी, हर्षद अधिकारी, भरत अधिकारी, प्रदीप अधिकारी, प्रवीण अधिकारी, अनिकेत शिंदे, हर्षद सावंत, ओंकार अधिकारी, रितेश अधिकारी, निखिल अधिकारी, प्रतीक अधिकारी, सुमित अधिकारी तसेच काकल उपसरपंच श्रीकांत जाधव, गजानन रिकामे, उदय लाड, सुरव येथील बाजी लहाने, आमडोशी येथील रमेश घोगरे व विहूले ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्ते आदींनी  राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडचिट्ठी देत विकासाच्या मुद्यावर शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना  शिंदे गटात स्वागत केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply