उरण ः रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य, कला महाविद्यालयातील अजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने अन्नपूर्णा योजनेंतर्गत फूड फेस्टिवल आयोजित केला गेला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांच्या हस्ते या फूड फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे, व्यवसायाला लागणारे भांडवल व त्यातून कशा पद्धतीने नफा मिळवावा हे विद्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन महाविद्यालयात केले गेले. यात विद्यार्थ्यांनी ढोकळा, चहा, मेदू वडा, चायनिज भेळ, न्यूडल्स, पिझ्झा, कटलेट, मिल्क शेक, कोल्ड्रिंक्स आदी पदार्थ स्वतः तयार करून त्या पदार्थांची विक्री केली. या आहार महोत्सवाचे आयोजन डी. एल. एल. विभाग प्रमुख प्रा. व्ही. एस. इंदुलकर, प्रा. रियाज पठाण, प्रा. कु. हन्नत शेख, प्रा. मेघा रेडी यांनी केले. या वेळी अकाउंटन्सी विभाग प्रमुख प्रा. के. ए. शामा, आयक्युएसी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या महोत्सवाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.