मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड नगर परिषदेने 2004 साली बांधलेली प्रियदर्शनी इमारत धोकादायक झाल्याने रविवारी (दि. 20) पाडण्यास अखेर सुरुवात करण्यात आली.
या इमारतीच्या तळ मजल्यावर व्यापार्यांसाठी गाळे तर पहिल्या मजल्यावर विविध समाजसेवी संघटनांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. येथे व्यायामशाळासुद्धा होती. परंतु इमारतीचा स्लॅब तसेच काँक्रिटच्या असणारा स्लॅब कोसळून लोखंडी सळ्या दिसू लागल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मुरूड नगर परिषदेने नगरसेवकांचा ठराव घेऊन ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. या इमारतीमधील गाळेधारकांना रितसर नोटीस देऊन गाळे रिकामे करण्यासाठी अवधी देण्यात आला होता. त्यानंतर रविवारपासून इमारत पाडण्याची सुरुवात करण्यात आली आहे.