उरण : वार्ताहर
दहावीच्या शालांत परीक्षेत उरण तालुक्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच उरण तालुक्यातील शिक्षकांनी हाती घेतले होते. या वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांत आनंदाश्रू काढत शिक्षकांचे आभार
व्यक्त केले.
अतिदुर्गम अशा उरण तालुक्यातील गोवठणे गावातील मूळ रहिवासी असणार्या अंजनी काशिनाथ म्हात्रे या कन्येने इतर गुणवंत विद्यार्थ्यांप्रमाणे दहावीच्या शालांत परीक्षेत सेमी इंग्रजी घेऊन 91.20 टक्के गुण मिळवून उरण शहरातील एन. आय. हायस्कूमध्ये द्वितीय क्रमांक काढला आहे. त्यामुळे अंजनी म्हात्रेचाही शिक्षक सेना रायगडकडून सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष निर्भय म्हात्रे, सरचिटणीस बबन पाटील, कोषाध्यक्ष रमणिक म्हात्रे, तालुका सचिव प्रवीण पाटील, तालुका कोषाध्यक्ष बी. जे. म्हात्रे, तालुका सहसचिव हि. सो. म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कोप्रोली लाखन पाटील, दिलीप म्हात्रे, तालुका सल्लागर के. आर. म्हात्रे आदी उपस्थित होते.