Monday , October 2 2023
Breaking News

पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

ध्वजारोहण, तिरंगा बाईक रॅली तसेच विविध कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने ध्वजारोहण तसेच युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली मोठ्या उत्साहात झाली. मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शहर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा बाईक रॅलीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल येथून सुरू झालेल्या या रॅलीत भारत मातेचा जयजयकार करण्यात आला. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन तसेच शिवरायांचा जयघोष करण्यात आला.
ध्वजारोहण समारंभाला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, संजय भगत यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply