Breaking News

अतिवृष्टीमुळे उरणमधील करंजा येथील भिंत कोसळून तिघे जखमी

उरण  : बातमीदार, प्रतिनिधी
सतत पडणार्‍या पावसामुळे उरणजवळील करंजा येथील एका घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 13) मध्यरात्री घडली. जखमींना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करंजामधील सातघर येथे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना मंगळवारी मध्यरात्री 3च्या सुमारास महेंद्र पाटील यांच्या राहत्या घराची भिंत पडली. या दुर्घटनेत संगीता महेंद्र पाटील, कुणाल महेंद्र पाटील व दिपेश महेंद्र पाटील हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे, तलाठी तेजस चौरले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व जखमींची विचारपूस केली. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply