Breaking News

मोदी सरकारच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील भाजप सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागवली होती.
आकडेवारीनुसार मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2004 ते 2013मध्ये 9,321 दहशतवादी कारवाया झाल्या, तर मोदी सरकारच्या काळात म्हणजे 2014 ते 2022पर्यंत 2,132 दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात 4,005, मोदी सरकारच्या काळात 1,538 दहशतवादी मारले गेले. काँग्रेसच्या काळात 1,028 दहशतवाद्यांना अटक झाली असून मोदी सरकारच्या काळात 1,432 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply