Breaking News

काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी?

उपखंडात नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, ही दहशतवादी संघटना आता काश्मीर खोर्‍यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात असून, भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा संघटनेने केला आहे, तसेच शुक्रवारी काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ठार केलेला इशफाक अहमद सोफी हा दहशतवादीही ‘आयएस’शी संबंधित होता, असा दावा संघटनेने केला आहे.

इस्लामिक स्टेटच्या वतीने एक वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. त्यात विलाय-ए-हिंद म्हणजेच भारतीय प्रांताचा उल्लेख करण्यात आला, मात्र त्यात जम्मू-काश्मीरचा उल्लेख करण्यात आला नाही. दहशतवादी संघटनेशी संबंधित काही लोकांनी सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीवेळी ही माहिती दिली होती.

इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीच्या समोर आलेल्या व्हिडीओत तो आपल्या संघटनेचा प्रभाव असलेल्या क्षेत्रांचा उल्लेख करत असल्याचे दिसते. त्यामुळे इस्लामिक स्टेटने केलेल्या दाव्याबाबतची चिंता वाढली आहे. बगदादीच्या व्हिडीओत ईस्टर संडेला श्रीलंकेत घडवलेल्या स्फोटांचाही उल्लेख होता. त्यामुळे इस्लामिक स्टेटच्या कारवायांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सावध भूमिका घेत संघटनेच्या प्रत्येक हालचालीवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष आहे.

आतापर्यंत इस्लामिक स्टेटकडून खोरासान प्रांताचा उल्लेख करण्यात येत असे. त्या माध्यमातून अफगाणिस्तान व आजूबाजूच्या प्रदेशात कारवाया वाढवण्याचा त्याचा प्रयत्न असे, मात्र आता थेट जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्याचे संकेत इस्लामिक स्टेटकडून देण्यात येत आहेत. त्यासाठी या संघटनेकडून स्थानिक दहशतवाद्यांसोबतही वाटाघाटी सुरू आहेत.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply