Breaking News

मोरबेतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांच्या धडाक्यामुळे अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत मोरबे येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 10) जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

पनवेल तालुक्यातील मोरबे गावात मंगळवारी शेकापचे पंचायत समिती माजी सदस्य जयवंत खोपकर यांच्यासह माजी सरपंच नारायण भगत, कांता भगत, जनार्दन भगत, नरेश भगत, योगेश भगत, राजेश भगत, रूपेश भगत, ज्ञानेश्वर गायकर, हरिशेठ नावडेकर, सुभाष पाटील, गोपीनाथ म्हात्रे, शशीकांत म्हात्रे, राम चौधरी, अंगद भगत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतले आहे. या कार्यक्रमाच्या वेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ भोपी, महादेव नावडेकर, कोंडलेचे सरपंच धनाजी शिंदे, कानपोलीचे सरपंच शाम पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …