Breaking News

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; उरणमध्ये पावसाचा जोर वाढला

उरण : रामप्रहर वृत्त

उरण शहर व तालुक्यात गुरुवारी (दि. 15) पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली असून गुरुवारी वादळीवार्‍यासह होणार्‍या पावसाचा जोर वाढल्याने उरण मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरणमध्ये मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अगदी पाच ते दहा मिनिटे कोसळणार्‍या पावसाच्या प्रमाणात बुधवारपासून वाढ झाली आहे. तर गुरुवारी पहाटे पासून सुरू झालेल्या या पावसाची संततधार व अधून मधून जोराचा असा पाऊस सुरू आहे. त्यामुळे उरणच्या बाजारात खरेदीसाठी तसेच मुलांना शाळेतून ने-आण करण्यासाठी जाणार्‍यांना या पावसाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे मध्येच उन्ह पडत असल्याने पावसा पासून बचाव करण्यासाठी छत्री किंवा रेनकोट न घेताच गेल्याने भिजत परतावे लागत आहे. दरम्यान, उरण मध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक मार्गावर असलेल्या खड्ड्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे.

हवेतील गारव्याने आजारांना आमंत्रण

सध्या सुरू असलेला पाऊस हा थंड असल्याने पावसात भिजल्यास थंडी भरण्याची शक्यता वाढली आहे. हवेतही गारवानिर्माण झाल्याने बदलत्या वातावरणाचा मानवाच्या शरीरावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील हा बदल अनेक आजारांना आमंत्रण देत असून डॉक्टरांनी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply