Breaking News

करंजा व रेवस जेट्टीचे काम सुरू

उरण : रामप्रहर वृत्त

येथील उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरण मधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरा दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गाला जोडणार्‍या अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याने करंजा जेट्टीचे कामास धीम्यागतीने सुरू असल्याचे मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. उरण व अलिबाग या दोन तालुक्यांदरम्यान चार किलोमीटरचे सागरी अंतर असून अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोट्या बोटीचा (तरीचा) वापर केला जात आहे. ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली त्यानुसार 25 कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो रो ची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर, कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली असल्याचे बोलले जात असले तरी रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान, या रो-रो सेवे मुळे उरण व अलिबागच्या प्रवाशी व नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील 50 किलोमीटर पेक्षा अधिकचे रस्ते मार्गातील अंतर कमी होणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply