Breaking News

फ्लेमिंगो शिल्पाकृती राष्ट्रीय विक्रमाची मानकरी

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पामबीच मार्गानजीकच्या सेक्टर 26 नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊतून 28.5 फूट उंचीची भव्य फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे. या शिल्पाकृतीची विशेष नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स या संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महापालिकेस याबाबतचे राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स संस्थेचे परीक्षक बी. बी. नायक यांनी टाकाऊ धातूंच्या यंत्रभागांद्वारे बनविलेले देशातील सर्वात उंच शिल्पाकृती असा मजकूर असलेले राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र व पदक महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे प्रदान केले. 26 वेगवेगळ्या यंत्रातील 1790 टाकाऊ यंत्रभागांपासून बनविलेली धातूची फ्लेमिंगो शिल्पाकृती लांबूनही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही शिल्पाकृती 28.5 फूट अर्थात 8.70 मीटर उंचीची असून 3.9 फूट उंचीच्या चौथ-यावर बसविण्यात आलेली आहे. या राष्ट्रीय विक्रमामुळे नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी ही ओळख राष्ट्रीय स्तरावर मुद्रांकित झालेली असून नवी मुंबईच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे मत आयुक्त बांगर यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply