Breaking News

हिंदी भाषा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा

पनवेल महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

हिंदी भाषा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी केले. हिंदी भाषा दिन बुधवारी (दि. 14) सर्वत्र साजरा करण्यात आला. यादिनानिमित्त सहयोग स्नेह सेवा संस्थानच्या वतीने नवीन पनवेल येथील कर्नाटक संघ हॉल येथे 70वा हिंदी दिवस मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत सर्वांना हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सहयोग स्नेह सेवा संस्थान या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. देशातील सर्वांनी इंग्रजी शिकणे जरुरी आहे, मात्र राष्ट्रभाषा हिंदीला विसरू नका, असे कळकळीचे आवाहन पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी या कार्यक्रमात केले. या वेळी काही जणांनी हिंदीतून कविता, गाणी म्हटले. हिंदी गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. नवीन पनवेल सेक्टर 3 येथील कर्नाटक हॉल मध्ये झालेल्या या हिंदी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आर. पी. यादव, जितेंद्र तिवारी, रूपा सिन्हा, सुनील सिन्हा, भाजप दक्षिण भारतीय सेल संयोजक श्रीनिवास कोडरू, संतोष बेन, कुलबीर सिंह चंडोक, कैलाश मिश्रा, कृष्णा तिवारी, पुष्पा तिवारी, अर्चना मुजामदार, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय पनवेल सेवाकेंद्राच्या प्रमुख तारादीदी, संस्थेचे आणि या संस्थेच्या प्रमुख संतोष दीदी, पत्रकार मिलिंद खारपाटील, कुलबीर सिंह, चंदा सिंह, श्याम दास आहुजा, लता श्रीवास्तव आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा तिवारी यांनी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply