माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील घोटवळ (ता. माणगाव) फाट्याजवळ मंगळवारी (दि. 13) होंडा एक्सेडची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
होंडा एक्सेड (एमएच-04,एचएन-9989) ही गाडी मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे येत होती. त्याचवेळी अतिश चंद्रकांत म्हस्के (रा. भुवन, ता. माणगाव) हे आपली दुचाकी (एमएच-06,सीजी-2424) चालवित जात होते. मंगळवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास माणगाव जवळील घोटवळ फाटा येथे होंडा एक्सेड गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अतिश चंद्रकांत म्हस्के जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास हवालदार तुणतुणे हे करीत आहेत.