Breaking News

हिंदी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

उरण : वार्ताहर

यु.ई.एस.च्या माध्यमिक आणि ज्यु. कॉलेज विभागातील  विद्यार्थ्यांनी हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यु.ई.एस. सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या सोनाली म्हात्रे, स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, सिनियर कॉलेजच्या एचओडी तसेच पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील पर्यवेक्षिका यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती. हिंदी दिवसानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. तर राष्ट्रभाषा का महत्त्व ह्या विषयावर काहींची भाषणेही झाली. त्यानंतर इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी देशभक्तिपर गीते, इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नृत्य, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हास्य नाटिका तर अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाद-विवाद प्रतियोगिता आयोजित केली गेली होती. कार्यक्रमाचे निवेदन, स्वागत व आभार प्रदर्शन माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी केले. स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या यांनीही कार्यक्रमाच्या शेवटी आपले मनोगत व्यक्त केले. हिंदी दिवसाची सांगता समुहगीताने व राष्ट्रगीताने झाली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply