-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
-विविध ठिकाणी शिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सर्वत्र समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्ताने भाजपच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पनवेल परिसरातील खांदा कॉलनी, खारघर आणि कामोठ्यात रविवारी (दि. 18) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने खांदा कॉलनी सेक्टर 1 येथे झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या शिबिरास भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, पं. स.चे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, रामनाथ पाटील, भीमराव पोवार, शशिकांत शेळके, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, महिला मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे, आशा मुंढे, आरती तायडे, संतोष आगलावे, अक्षय सिंग, विश्वजित पाटील, गौरव कांडपिळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदाते उपस्थित होते. खारघर तळोजा मंडल भाजप युवा मोर्चाच्या वतीने खारघर सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गरीब आणि गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री साई ब्लड बँक पनवेलच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात अनेक युवकांनी तसेच विविध समाजाच्या व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिराला भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पं. स.चे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, निलेश बाविस्कर, अॅड. नरेश ठाकूर, प्रवीण पाटील, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, बीना गोगरी, रमेश खडकर, वासुदेव पाटील, अमर उपाध्याय, अल्पसंख्याक सेल प्रदेश सचिव मन्सूर पटेल, युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत, गीता चौधरी, शुभ पाटील, अक्षय पाटील अंबालाल पटेल, सचिन वासकर, प्रभाकर जोशी, अॅड. इर्शाद पटेल, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, नवनीत मारू, फुलाजी ठाकूर, किरण पाटील, म्हात्रे, कुणाल संघानी, नंदकुमार मोरे, प्रमोद पाटील, पप्पू खामकर, सुमीत सहाय, जयश्री सूर्यवंशी, सुशीला शर्मा, निर्मला यादव, दिनेश रणशेवडे, सुजित पांडे आदी उपस्थित होते. कामोठ्यातील स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे निर्धार सामाजिक संस्था व झेंडा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजप कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, जय पावणेकर, अशोक पावणेकर, निलेश आहेर, विशाल बेलकर, अजित पवार, किरण भोसले आदी उपस्थित होते.