Breaking News

खारघर, कामोठ्यात भाजपतर्फे महिलांचा सन्मान

खारघर : रामप्रहर वृत्त

भाजप महिला मोर्चा खारघर, शिवतेज मित्र मंडळ खारघर, श्रीसाबाई माता महिला मंडळ तसेच प्रभाग 5 भाजप महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. या  कार्यक्रमात खारघर-तळोजा आरोग्य विभागातील आशासेविका, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान महिला व युवा खेळाडूंचा सत्कार

करण्यात आला.

कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या 25 आशा सेविकांचा त्यांच्या पर्यवेक्षिका ऋतुजा शेपुंडे यांच्यासहित सर्वांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.

विशेष विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात त्यांना स्वावलंबी बनविण्याचा विडा उचलणार्‍या डॉ. जयप्रभा आसुरे, डॉ. स्वाती खाडे, स्मिता स्वामी यांचाही सत्कार करण्यात आला. खारघर शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची कन्या स्नेहल माळी हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविल्या बद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खारघर मंडळाचे सरचिटणीस दीपक शिंदे, शिवतेज मित्र मंडळाचे संचालक रमेश खडकर व त्यांचे सर्व सदस्य तसेच श्रीसाबई माता मंडळाच्या अध्यक्षा सीमा खेडकर व सर्व सदस्या यांनी विशेष मेहनत घेतली.

या कार्यक्रमाला उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पाटील, सरचिटणीस मृणाल खेडकर, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ‘च्या सभापती अनिता पाटील, खारघर-तळोजा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, नगरसेविका संजना कदम, उपाध्यक्ष बिना गोगरी, अनिता जाधव, सरचिटणीस साधना पवार, प्रतीक्षा कदम, चांदनी अवघडे, मोना अडवाणी, अश्विनी भुवड, आशा शेडगे, शोभा मिश्रा, स्मिता आचार्य, अंजुबेन पटेल, विश्व मांगल्य सभेच्या कोषाध्यक्ष हर्षदा गोळवलकर, सुरेखा गांधी, विनिता गुमरे, सुनीता महर्षी याशिवाय खारघर-तळोजा मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष बंडू शिंगरूट, उद्योग आघाडी संयोजक मामा मांजरेकर, सोशल मिडीया अध्यक्ष अजय माळी, आध्यात्मिक सेल संयोजक नंदकुमार मोरे, आदेश भोईर, संदीप कासार, सचिन केदार, आनंद कांबळे, राजू विरेकर, कमलेश मिश्रा, जगन्नाथ भानत, पुष्पा शिंगरूट, ममता आचरेकर, पल्लवी सोनवणे, शिल्पा विरेकर, स्वाती राणे, संगीता खोकले असे अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कामोठे : रामप्रहर वृत्त

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधुन कोरोना काळात ज्या महिलांचे विशेष योगदान लाभले अशा कोविड योद्ध्या महिला व आदर्श महिलांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, पोलीस, रिपोर्टर तसेच परिचारिका यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील, सरचिटणीस मृणाल खेडकर, चिटणीस जयश्री धापते, माजी नगरसेविका तथा जिल्हा चिटणीस विनीता खेडकर, कामोठे मंडल अध्यक्षा वनिता पाटील, महिला मोर्चा सदस्या सुरेखा गांधी, खोपोली शहर अध्यक्षा सुमती महर्षी, नगरसेविका कुसुम म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षा संध्या शालबिद्रे, हर्षला ताई, नगरसेविका हेमलता गोवारी, पुष्पा कुतरवडे, चारुशिला घरत, दर्शना भोईर, महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका मोनिका महानवर, आदी भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply